Home ठळक बातम्या कल्याण लोकसभा सगळे रेकॉर्ड तोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; डॉ. श्रीकांत शिंदेंच्या...

कल्याण लोकसभा सगळे रेकॉर्ड तोडणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; डॉ. श्रीकांत शिंदेंच्या प्रचारासाठी डोंबिवलीत भर पावसात उपस्थिती

डोंबिवली दि.16 मे :
इतका पाऊस पडत असूनही आपण सर्व जण या रॅलीत सहभागी झाला आहात. त्यामुळे कल्याण लोकसभा यंदा नक्कीच सगळे रेकॉर्ड तोडेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (Kalyan Lok Sabha will break all records – Chief Minister Eknath Shinde; Dr. Attendance in Dombivli in heavy rain for Srikant Shinde’s campaign)

कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ते डोंबिवलीत आले होते. डोंबिवली पूर्वेतील नांदीवलीच्या स्वामी समर्थ चौकातून भर पावसात निघालेल्या रॅलीमध्ये ते सहभागी झाले होते. मात्र पाऊस पडत असूनही ना ही रॅली थांबवण्यात आली ना मुख्यमंत्री रथावरून उतरले.

भर पावसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यांच्यासोबत कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्याचे मंत्री संजय बनसोडे, मंत्री संजय राठोड, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महायुतीचे हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

आमची विचारधारा बाळासाहेबांची, त्यांची सावरकरांची बदनामी, अतिरेक्यांचे उदात्तीकरण करणारी – मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन सरकार स्थापन केले. आमची विचारधारा ही बाळासाहेबांची आहे. तर त्यांची विचारधारा सावरकरांची बदनामी करणारी, औरगंजेबाची बाजू घेणारी, बॉम्बस्फोट केलेल्या याकूब मेमन याच्या कबरीचे, रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात, बॉम्बस्फोट आरोपी इकबाल मुसा यांचे उदात्तीकरण करणारी असल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केला. डोंबिवलीतील डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली निघण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते.

आमची विचारधारा ही देशभक्तीची, राष्ट्रभक्तीची आणि बाळासाहेबांच्या विचाराची आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांची विचार धारा एक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

श्रीकांत शिंदे यांनी आपली स्वतःची ओळख बनवली…
कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे डॉ. श्रीकांत शिंदे यांचेच लक्ष असल्याने याठिकाणी इतकी विकासकामे झाली आहेत. आपली तिसरी लोकसभा निवडणुक लढणाऱ्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपली स्वतःची ओळख बनवली आहे. त्यांच्या माध्यमातून याठिकाणी मेट्रो, रोड, रेल्वे , उड्डाणपूल यासारखी अनेक विकासकामे झाली आहेत. गेल्या दहा वर्षांत त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात खूप काम केली आहेत. त्यातही पायाभूत सुविधांची विकासकामे मोठ्या संख्येने केली असून यंदा ते गेला रेकॉर्ड तोडतील असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा