कल्याण दि.15 सप्टेंबर :
कल्याण पूर्व आणि पश्चिमेचा पाणी पुरवठा येत्या मंगळवारी 20 सप्टेंबर रोजी १२ तास बंद राहणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका पाणी पुरवठा डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही माहिती दिली आहे.
केडीएमसीच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये विद्युत आणि यांत्रिक उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे 20 सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कल्याणमध्ये पाणी पुरवठा होणार नसल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात आले आहे.