कल्याण डोंबिवली दि.27 एप्रिल :
कल्याण डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती जाणवू लागली असून आज या दोन्ही शहरांमध्ये तब्बल 41.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. दोन आठवड्यांपूर्वीही अशाच प्रकारे आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे इथले तापमान तब्बल 43 अंशापार पोहचले होते.
पुढील 2-3 दिवसांसाठी ठाणे, मुंबईसह कोकण परिसरामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या तापमान वाढीचे आज चांगलेच चटके जाणवले. गेल्या 12 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान अशाच प्रकारे उष्णतेची लाट आली होती. त्यामुळे आजही कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण एमएमआर परिसरात तापमानाने चाळीशी ओलांडल्याचे दिसून आल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
प्रमूख शहरांमध्ये नोंदवण्यात आलेले आजचे तापमान..
कल्याण 41.7सेल्सियस
डोंबिवली 41.7
मुंबई 36.6
मीरा रोड 36.7
ठाणे 41
कळवा 41.4
मुंब्रा – 41.5
भिवंडी 41.6
बदलापूर 41.8
मुरबाड 43
कर्जत 43.5