कल्याण डोंबिवली दि.30 एप्रिल :
गेल्या 3 दिवसांपासून सतत उष्णतेच्या लाटेमध्ये होरपळून निघालेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये आजही 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. एकीकडे अक्षरशः आग ओकणारा सूर्य आणि दुसरीकडे असह्य अशा उकाड्यामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.
गेल्या शनिवारपासून पुन्हा आलेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांचा जीव नकोसा करून ठेवला आहे. सकाळपासूनच या जीवघेण्या गर्मीचे चटके नागरिकांना बसत आहेत. जसजशी दुपार जवळ येते तेव्हापासून संध्याकाळपर्यंत तर रखरखत्या उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या चार दिवसांपासून कल्याण डोंबिवली आणि आसपासच्या शहरातील तापमानाचा पारा सतत चाळीशीपार जात असून 42 ते 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
तर आजही कल्याण डोंबिवलीसह एमएमआर रिजनमधील शहरांमध्ये अशाच प्रकारचे उच्चांकी तापमान नोंदवले गेले आहे. असे असले तरी उद्यापासून ही उष्णतेची लाट ओसरण्यास सुरुवात होणार असून त्यापुढील काही दिवस तात्पुरते 38 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत राहून वीकेंडला त्यात पुन्हा वाढ होईल. तर पुढील आठवड्यापासून मात्र लोकांना तापमानात काहीसा दिलासा मिळणे अपेक्षित असेल अंदाजही अभिजीत मोडक यांनी व्यक्त केला आहे.
प्रमूख शहरांमध्ये नोंदवण्यात आलेले आजचे तापमान…
कल्याण 42
डोंबिवली 41.8
बदलापूर 41.8
ठाणे 41.4
मनोर 41.4
पनवेल 42
भिवंडी 42.2
कळवा 42.2
मुंबई 38.4°C
मिरारोड 38.6
दापोली 39.3
विरार 40.3
नवी मुंबई 40.4
मुलुंड 40.4
तलासरी 41
पालघर 41.2
मुंब्रा 41.2
मुरबाड 43.2
कर्जत 44