Home ठळक बातम्या गेल्या 24 तासांत कल्याण डोंबिवलीत झालाय इतका पाऊस

गेल्या 24 तासांत कल्याण डोंबिवलीत झालाय इतका पाऊस

ठाणे दि.25 जुलै :
काल रात्रीपासून ठाणे जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. परिणामी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने सखल भाग जलमय झाले आहेत.

गेल्या 24 तासांत ठाणे जिल्ह्यात पडलेल्या पावसाचा विचार करता मुरबाड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. तर त्याखालोखाल ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची नोंद झाली आहे. तर संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा विचार करता सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने गेल्या 24 तासांमध्ये 100 मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे.

पावसाची आकडेवारी

ठाणे 144.6
कल्याण डोंबिवली 128.5
मुरबाड 212.8
भिवंडी 112.7
शहापूर 115.5
उल्हासनगर 115.8
अंबरनाथ 119

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा