Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवली पुन्हा झाले गारेगार; पारा आला १४ अंशांवर

कल्याण डोंबिवली पुन्हा झाले गारेगार; पारा आला १४ अंशांवर

कल्याण – डोंबिवली दि. २४ डिसेंबर :

या आठवड्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर हीटसारख्या गर्मीने हैराण झालेले कल्याण डोंबिवलीकर रात्रीपासून आलेल्या गारव्याने सुखावले आहेत. कल्याण आणि डोंबिवली अशा दोन्ही ठिकाणी आज सकाळी किमान तापमानाची १४ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.

गेल्या आठवड्यात दक्षिणेला आलेल्या वादळामुळे तापमानात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. आल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या ऐन डिसेंबर महिन्यात ऑक्टोबर हीट प्रमाणे उन्हाचे चटके जाणवले. त्यामुळे गेल्या दहा वर्षांतील सर्वात उष्ण डिसेंबर महिना म्हणून यंदा नोंद झाल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सांगितले.

हवामान अभ्यासकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पुन्हा एकदा वातावरणात बदल झाल्याचे दिसत आहेत. किमान (mini) तापमानासह कमाल (max) तापमानातही घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानूसार हे बदल दिसत असल्याची माहितीही मोडक यांनी दिली.

कल्याण डोंबिवलीसह बदलापूरपर्यंतच्या पट्ट्यामध्ये काल रात्रीपासून अचानक गारठा वाढल्याचे दिसून आले. वातावरणातील हा गारवा इतका जास्त आहे की सकाळी दहा वाजून गेल्यानंतरही थंडी जाणवत असल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी दिली.

आज नोंदवण्यात आलेले किमान तापमान

कल्याण १४
डोंबिवली १४.४
बदलापूर ११.४
ठाणे १५
मुंबई १६
नवी मुंबई १६.२
कर्जत ११.८
तलासरी १०

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा