Home क्राइम वॉच 84 वर्षांच्या वृद्ध पतीकडून 80 वर्षे वृद्ध पत्नीच्या हत्येने कल्याण-डोंबिवली हादरली

84 वर्षांच्या वृद्ध पतीकडून 80 वर्षे वृद्ध पत्नीच्या हत्येने कल्याण-डोंबिवली हादरली

 

दोघेही केडीएमसीच्या माजी नगरसेवकाचे आई-वडील

डोंबिवली दि.31 जानेवारी :
एका 84 वर्षीय वृद्ध पतीने 80 वर्षीय पत्नीची निर्घृण हत्येच्या घटनेने कल्याण डोंबिवली हादरून गेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माजी नगरसेवकाचे हे दोघे आई-वडील आहेत. या हत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी घरगुती वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. कल्याण शिळ रोडवरील गोळ्वली गावात ही घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे वृद्ध पटीने आधी पत्नीला धारदार शस्त्राने वार करून ठार करत नंतर घरातच तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पतीला अटक केली आहे.

बळीराम पाटील वय वर्षे 84 असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या वृद्ध पतीचे नाव आहे. तर पार्वती वय वर्षे 80 असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. कल्याण-शिळ मार्गावरील गोळवली परिसरात आरोपी बळीराम पाटील हे पत्नी पार्वती सोबत राहत होते. काही कारणावरून शनिवारी रात्रीच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन बळीराम यांनी पत्नीवर धारदार शस्त्राने वार केले. ज्यात पत्नी पार्वती यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर बळीराम पाटील यांनी पार्वती यांचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. रविवारी सकाळी घरातील एक सदस्य आरोपीच्या बेडरूममध्ये गेल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बळीराम पाटील यांना ताब्यात घेतले. या हत्येचे नेमके कारण समोर आले नसले तरी, घरगुती भांडणातून ही हत्या झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा