मुंबई दि. १२ ऑगस्ट :
महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी जगन्नाथ (आप्पा) शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर यांची पुन्हा निवड झाली आहे. विशेष म्हणजे सलग नव्व्यांदा अध्यक्ष आणि सचिव म्हणून बिनविरोध निवडून येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे.
महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्टा असोसिएशनचे राज्यभरात तब्बल १ लाख सदस्य आहेत. इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या या प्रमूख संघटनेवर जगन्नाथ (आप्पा) शिंदे आणि अनिल नावंदर हे ज्यातील १ लाख केमिस्टचे नेतृत्व करणाऱ्या या राज्य संघटनेवर गेल्या २५ वर्षापासून हे दोघे जण अतिशय सक्षमपणे प्रतिनिधित्व करत आहेत. या संघटनेच्या अध्यक्ष आणि सचिव या प्रमूख पदांसह इतर सर्व पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
राज्य संघटनेच्या दादर, मुंबई कार्यालयात यासंदर्भातील नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पडली. दि महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या २०२३-२०२६ या कालखंडाकरता निवडणुक प्रक्रिया सुरु होती. संघटनेतील ७ जागांकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा राज्य संघटनेच्या हॉटेल एक्सप्रेस इन, नाशिक येथे २० ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या आमसभेत केली जाणार आहे.
यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून दिलीप कदम, नितीन देव, सुनिल छाजेड यांनी कामकाज पाहिल्याची माहिती राज्यसंघटनेचे जनसंपर्क अधिकारी अजित पारख यांनी दिली आहे.
अशी आहे संघटनेची कार्यकारिणी…
अध्यक्ष– जगन्नाथ शिंदे (ठाणे),
उपाध्यक्ष मुकुंद दुबे (चंद्रपुर),
उपाध्यक्ष अरुण बरकसे (बीड),
सचिव– अनिल नावंदर (बुलढाणा)
कोषाध्यक्ष – वैजनाथ जागुष्टे (रत्नागिरी), सहसचिव – प्रसाद दानवे – (मुंबई,)
संघटन सचिव – मदन पाटील (कोल्हापुर)