कल्याणातील व्हर्टेक्स इमारतीच्या आगीवरून केडीएमसी प्रशासनावर आगपाखड
कल्याण दि.27 नोव्हेंबर :
राज्यामध्ये महायुती निवडून येण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असून मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनाच मिळावे अशी राज्यातील जनतेचीच इच्छा असल्याची भावना कल्याण पश्चिमेतील शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या सस्पेन्सबाबत प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना भोईर यांनी ही भावना व्यक्त केली. (It is the desire of the people of the state that Eknath Shinde should become the Chief Minister again – the feeling of MLA Vishwanath Bhoir)
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार एवढ्या मोठ्या संख्येने निवडून येण्यामागे या शासनाचे, महायुतीचे काम किंवा सरकारने जे निर्णय घेतले, ज्या योजना राबवल्या होत्या त्याचा एकत्रीत परिणाम आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत असल्याचे विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.
तसेच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री म्हणून चेहरा शासनाने राबवलेल्या योजनांपैकी सर्वात महत्वाची योजना लाडकी बहीण योजना आहे. पूर्ण महाराष्ट्रात ही योजना उचलून धरली गेली राज्यातील लाडक्या बहिणींनी आपल्या भावाच्या पारड्यात भरघोस मतदान टाकले. महायुती भरघोस मतांनी निवडून येण्यामागे लाडकी बहीण योजनेचाही मोठा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची, लाडक्या बहिणींसह शेतकरी, कामगार, कष्टकरी, युवक आणि जेष्ठ नागरिक अशा समाजातील सर्वच घटकांची हीच इच्छा आहे की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच व्हावे. जेणेकरून महाराष्ट्राचा गाडा सुरळीतपणे चालेल आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे अशी आपल्यासह सर्वांची इच्छा असल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी स्पष्ट केले.
व्हर्टेक्स आग दुर्घटनेवरून केडीएमसी प्रशासनावर आगपाखड…
तर कल्याण पश्चिमेतील हायफाय सोसायटी असलेल्या व्हर्टेक्स इमारतीमधील आगीच्या घटनेवरून आमदार विश्वनाथ भोईर यांनी केडीएमसी प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली. बहुमजली इमारतीमधील आग विझवण्यासाठी आवश्यक असणारी उंच शिडीची गाडी ही बंद असून तिच्या दुरुस्तीची फाईल ही केडीएमसी अधिकाऱ्यांनी तब्बल सहा महिने रखडवून का ठेवली? या गाडीच्या दुरुस्तीचे गांभीर्य या अधिकाऱ्यांना नव्हते का? जर या आगीच्या दुर्घटनेत लोकांचे जीव गेले असते तर त्याची जबाबदारी कोणी घेतली असती? असे संतप्त सवाल विचारत हे पूर्णपणे केडीएमसी प्रशासनाचे अपयश असल्याची टीका आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली. केडीएमसी प्रशासनाच्या प्रमुख म्हणून आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. जर आपण नागरिकांकडून कर गोळा करतो तर नागरिकांच्या सोयी सुविधा आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करणे हे केडीएमसी प्रशासनाचे आद्यकर्तव्य असल्याची सांगत आमदार भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला आपल्या जबाबदारीबाबत आठवण करून दिली. तसेच यापुढे तरी अशा घटना घडू नये यासाठी केडीएमसिनोर्शने तत्पर राहावे अन्यथा सत्तेमध्ये असूनही आम्हाला आमच्या पद्धतीने त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागेल असा सज्जड इशाराही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिला आहे.