Home ठळक बातम्या अदानी समूहाच्या कारभाराची चौकशी करा; कल्याणात बँकेसमोर काँग्रेसचे आंदोलन

अदानी समूहाच्या कारभाराची चौकशी करा; कल्याणात बँकेसमोर काँग्रेसचे आंदोलन

 

कल्याण दि.6 फेब्रुवारी :
हिंडनबर्ग रीसर्चचा अहवाल समोर आल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी चर्चेत आले आहेत याप्रकरणी आता विरोधकांनीही केंद्र सरकारविरोधात आघाडी उघडत चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. कल्याणातही काँग्रेस पक्षातर्फे या मागणीसाठी एसबीआय बँकेसमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

हिंडनबर्ग रिसर्च संस्थेचा अहवाल आल्यानंतर उद्योग क्षेत्रासह शेअर मार्केटमध्ये प्रचंड उलथा पालथ झाली आहे. त्याचे आता राजकीय पडसाद उमटताना दिसत असून काँग्रेसने देशभर रान उठवण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कल्याण पश्चिमेत काँग्रेस पक्षातर्फे एस बी आय बँकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

उद्योगपती गौतम अदानी यांच्या उद्योग समुहात एसबीआय, एलआयसी आणि इतर सरकारी वित्तिय संस्थांच्या नियमबाह्य गुंतवलेल्या पैशांची चौकशी करण्याची मागणी कल्याण शहर काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. तसेच विरोधकांची इडी चौकशी करणारे केंद्र सरकार आता याप्रकरणी अदानी समूहाची इडी चौकशी करणार का असा सवालही सचिन पोटे यांनी यावेळी उपस्थित केला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, प्रदेश सचिव मुन्ना तिवारी, ब्लॉक अध्यक्ष विमल ठक्कर, अमित म्हात्रे, शकील खान यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा