Home ठळक बातम्या गुडन्यूज : कल्याणातील कुस्ती खेळाडूंना उपलब्ध झाली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट

गुडन्यूज : कल्याणातील कुस्ती खेळाडूंना उपलब्ध झाली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट

 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

कल्याण दि.23 ऑगस्ट :
कल्याणातील कुस्ती खेळाडूंना जागतिक स्पर्धांच्या दृष्टीने तयार होण्यासाठी आवश्यक असणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट उपलब्ध झाली आहे. कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरातील जय बजरंग तालीम संघाला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कुस्ती खेळण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट दिली आहे.

कल्याणमधील नांदीवली गावात असलेल्या जय बजरंग तालीम संघाने आजवर अनेक कुस्ती खेळाडू घडवले आहेत. आधी कुस्ती मातीत खेळली जात होती. आता कालानुरूप त्यात बदल झाले असून स्पर्धाही वाढली आहे. त्यासाठी मॅट उपलब्ध करुन देण्याची मागणी नांदवली गावचे माजी सरपंच रामदास ढोणे, पंढरीनाथ ढोणे यांच्यासह विविध खेळाडूंनी केली होती. त्यानूसार खासदार डॉ. शिंदे यांनी ही मॅट उपलब्ध करून दिली आणि काल त्याचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कुस्ती शिकणाऱ्या मुलांनी मॅटवर कुस्तीची प्रात्याक्षिकेही करून दाखविली. या मॅटवर उत्तम सराव करुन उत्तम खेळाडू घडतील. केवळ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या बाहेर नाव कमाविण्यासाठी त्यांना उर्जा आणि प्रशिक्षण मिळेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच जय बजरंग तालीम संघाच्या व्यायाम शाळेच्या जागेत कुस्तीगीरांना आणि परिसरातील नागरिकांना नियमित व्यायामाकरिता लागणारे व्यायामशाळा साहित्य देखील उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
या लोकर्पण कार्यक्रमाप्रसंगी कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे, उल्हासनगर महापालिका गटनेता धनंजय बोडारे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, कल्याण पंचायत समिती माजी सभापती सदाशिव गायकर, नगरसेवक महेश गायकवाड, मारुती पाटील, विभागप्रमुख रामदास ढोणे, मदन चिकणकर, उपमहाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर युवराज वाघ तसेच कल्याण- ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगीर,वस्ताद उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा