Home ठळक बातम्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या अविष्कार – कल्पकतेकडून कृतीकडे विज्ञान प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

छत्रपती शिक्षण मंडळाच्या अविष्कार – कल्पकतेकडून कृतीकडे विज्ञान प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

कल्याण दि.4 फेब्रुवारी :
कल्याणातील शिक्षण क्षेत्रातील एक दिग्गज संस्था असलेल्या छत्रपती शिक्षण मंडळाच्या “अविष्कार –
कल्पकतेकडून कृतीकडे विज्ञान प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाची अंतिम फेरी कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालय येथे संपन्न झाली. (Innovations of Chhatrapati Education Board – From Imagination to Action Science Exhibition Huge Response)

या विज्ञान प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे एकूण 21 शाळांमधील 103 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत वेगवेगळे 42 प्रकल्प या प्रदर्शनात सादर केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान भारती, जिल्हादायित्व विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षा महाराष्ट्र संयोजक सुभाष पाटील तसेच छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, उपाध्यक्ष ना. के. फडके कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे सरचिटणीस डॉ. निलेशजी रेवगडे, चिटणीस मिनाक्षी गागरे, भारती वेदपाठक संस्था सदस्य मिलिंद कुलकर्णी यांच्यासह संस्थेतील विविध शाळांचे मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी प्रयोगाची अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडणी केली होती. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून नरेंद्र गोळे, सुमन नायर, मोमीन सादिया, अंजुम जावेद अहमद, गोपा घोष यांनी परीक्षण केले. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येक गटांमध्ये 3 क्रमांक काढण्यात आले. त्याचा निकाल पुढीलप्रमाणे…

इ. 6 वी
प्रथम
स्मार्ट सिटी – विवेकानंद संकुल, प्राथमिक इंग्रजी माध्य.
द्वितीय
मल्टीटास्किंग सोलर स्टेशन – नूतन ज्ञानमंदिर, कल्याण
तृतीय
अपारंपारिक ऊर्जानिर्मिती – विवेकानंद संकुल सानपाडा, प्राथमिक मराठी माध्य.
उत्तेजनार्थ
हायड्रोपॉवर (विद्यामंदिर मांडा टिटवाळा )

इ. 7 वी
प्रथम
स्मार्ट ग्लासेस फॉर ब्लाइंड पीपल
विवेकानंद संकुल सानपाडा,इंग्रजी माध्यम
द्वितीय
औषधी वनस्पतींचे उपयोग – सरस्वती विद्यामंदिर सायले
तृतीय
स्मार्ट सिटी -विद्यामंदिर,मांडा -टिटवाळा
उत्तेजनार्थ
औषधी वनस्पती – जनता विद्यालय प्रशाला, दहिवली

इ. 8 वी
प्रथम
गाड्यांच्या धुरापासून शाई निर्मिती – विक्रमगड हायस्कूल विक्रमगड

*द्वितीय*
ग्रीन सोलर सिटी – माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल, सानपाडा

तृतीय
कार्बन प्युरिफिकेशन – विद्यामंदिर मांडा टिटवाळा

उत्तेजनार्थ
स्मार्ट लगेज ट्रॅव्हलर – नूतन ज्ञानमंदिर कल्याण

इ. 9 वी
प्रथम क्रमांक
इलेक्ट्रिसिटी फ्रॉम गार्बेज – नवजीवन विद्यालय कल्याण

*द्वितीय*
आत्मनिर्भर गाव – नूतन विद्यालय कल्याण
औषधी वनस्पतींचे उपयोग -जनता विद्यालय,
धसई

तृतीय
पुनर्वापर आणि पुनचक्रीकरण – अभिनव ज्ञानमंदिर ऊसर,खुर्द

उत्तेजनार्थ
औषधी वनस्पतींचे उपयोग -विद्यामंदिर मांडा टिटवाळा

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता कानेटकर यांनी केले. संस्थेच्या NEP समन्वयक उर्मिला जाधव तसेच उपप्रमुख जाहिरा तडवी यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली, तर आभार प्रदर्शन संजय मंजुळे यांनी केले. या कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन श्रीहरी पवळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आणि वृत्तलेखन शुभांगी भोसले यांनी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा