कल्याण दि. 8 ऑक्टोबर :
कल्याण शहरातील नामांकित शारदा मंदिर संस्थेच्या बालोद्यानाचा उद्घाटन समारंभ काल थाटामाटात संपन्न झाला. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून उभारण्यात आलेले हे बालोद्यान शारदा मंदिर संस्थेच्या अध्यक्षा वैजयंती गुजर घोलप यांच्या हस्ते चिमुरड्यांसाठी खुले करण्यात आले.
इनरव्हील क्लब कल्याणच्या तत्कालीन अध्यक्षा साची कदम आणि विद्यमान अध्यक्षा निता कदम तसेच इनरव्हील क्लबच्या योगदानाने हे बालोद्यान शारदा मंदिर संस्थेला उपलब्ध झाले आहे. या बालोद्यानात शिशु वर्ग, १ ली ते ५ वी च्या वर्गातील विद्यार्थ्यासाठी झूला, घसरगुंडी आणि इतर अनेक मनोरंजक क्रीड़ा साधनांचा आनंद मुलांना लूटता येणार आहे.
सामाजिक जाणिवेतून उपलब्ध करून दिलेल्या या बालोद्यानाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैजयंती गुजर घोलप यानी इनरव्हील क्लबचे आभार मानत त्याच्या सदस्यांचा सन्मान केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांनी केले. यावेळी पूर्व प्राथमिक, प्राथमिक ,माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तसेच आभार भरत दळवी यांनी केले. माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका वैशाली देशमुख , सुरेखा पाटील यानी मान्यवरांचे स्वागत केले.यावेली इनरव्हील क्लब कल्याणच्या पदाधिकारी सेक्रेटरी मीनाक्षी देवकर, माजी अध्यक्षा लीना काटकर, सुलभा लिमये , मधुमती भागवत, शिरीन भेताशीवाला तसेच शारदा मंदिर संस्थेचे कोषाध्यक्ष सुधाकर बोरसे , संचालक रमेश मोरे , प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पटवर्धन सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.