ठाणे दि.13 जुलै :
ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील शाळा उद्या आणि परवा म्हणजेच 14 आणि 15 जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
ठाणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये आणि अतिवृष्टिमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांना होऊ नये यासाठी ठाणे जिल्ह्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली आहे.