दिल्लीतही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मंत्री रविंद्र चव्हाण आणि शिष्टमंडळ केंद्राच्या बैठकीला उपस्थित
डोंबिवली दि.15 ऑक्टोबर:
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने राज्याच्या भाजप कोअर कमिटीची बैठक सोमवारी संपन्न झाली असून त्यानंतर दिल्ली मध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री रविंद्र चव्हाण आणि अन्य मान्यवर मंडळी केंद्राच्या कोअर कमिटी बैठकीला सोमवारी गेले.
त्या दोन्ही बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सोमवारी चर्चा झाली. त्यावेळी मुंबईत आमदार प्रवीण दरेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आदींनी मार्गदर्शन केले.
कोकणच्या दृष्टीने निवडणूक संदर्भात मुद्यांवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली, त्यावर सखोल चर्चा झाली. त्या पट्ट्यातील ४८ विधानसभांबाबत माहिती देऊन सद्यस्थिती सांगण्यात आली. त्या बैठकीला माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.