Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांना करमाफी द्या : नरेंद्र पवार...

कल्याण डोंबिवलीत 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांना करमाफी द्या : नरेंद्र पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

कल्याण – डोंबिवली दि. 23 मार्च :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करण्याची मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मागणी केल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना राज्य सरकारने घरपट्टी माफ केली आहे. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील घरांना सुविधेचा लाभ द्या असे साकडे नरेंद्र पवार यांनी राज्य सरकारला घातले आहे.

या संदर्भात येत्या 10 दिवसांत जर निर्णय घेतला नाही तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर भव्य मोर्चा काढून याची तीव्रता लक्षात आणून देणार असल्याचे पत्रही पवार यांनी 16 मार्च 2022 रोजी महानगरपालिकेला दिले आहे. जर सरकार मुंबई आणि नवी मुंबईसाठी हा निर्णय घेत असेल. तर तोच न्याय कल्याण डोंबिवलीलाही द्यावा. 500 चौरस फुटापर्यंत घर असणारे नागरिक सामान्य असतात, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आर्थिक कर भरण्यासाठी दमछाक होते यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. दरम्यान कल्याण पश्चिममधील विविध विकासकामाच्या संदर्भातही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा केल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा