ठाणे एलएनएन न्युज अपडेट दि. 27 जुलै :
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाबाबत आज सकाळपासून उलट सुलट मेसेज फिरत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली असून कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज सकाळपासून सोशल मीडियावर “बारवी धरण भरले आणि दरवाजे उघडले” अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले असून जिल्हा प्रशासनाने त्याचे खंडन केले आहे. बारवी धरण अद्याप तरी ओव्हरफ्लो झाले नसल्याची महत्त्वाची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Local News Network – LNN)
जिल्हा प्रशासनाने दिलीय ही माहिती…
बारवी धरणाची आजची पाणी पातळी ही 70.74 मीटर असून अजून धरण ओव्हरफ्लो झालं नाही. धरणाचे दरवाजे स्वयंचलित असून पाणी पातळी वाढली की धरणाचे दरवाजे आपोआप उघडले जातात. धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी अद्याप 6 फूट पाणी वाढणे गरजेचे आहे.
त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Local News Network – LNN)