Home ठळक बातम्या महत्त्वाची माहिती: येत्या मंगळवारी (1 ऑक्टोबर2024) कल्याण पूर्व – पश्चिमेचा पाणी पुरवठा...

महत्त्वाची माहिती: येत्या मंगळवारी (1 ऑक्टोबर2024) कल्याण पूर्व – पश्चिमेचा पाणी पुरवठा बंद

कल्याण दि.28 सप्टेंबर :
येत्या मंगळवारी (1 ऑक्टोबर2024) कल्याण पूर्व – पश्चिमेचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. बारावे जलशुध्दीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या सबस्टेशनमधील फिडरमध्ये केल्या जाणाऱ्या देखभाल दुरूस्ती कामामुळे कल्याणचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
बारावे जलशुध्दीकरण केंद्रातील फिडरच्या कामासाठी मंगळवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महावितरणतर्फे शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी कल्याण पूर्व आणि पश्चिममेचा पाणी पुरवठाही सकाळी 10 ते सायंकाळी 4 असा 6 तास बंद राहणार असल्याची माहिती केडीएमसीच्या यांत्रिकी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिली आहे.(LNN- LocalNewsNetwork)

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा