
मुंबई दि.21 मार्च :
राज्य शासनाच्या परिवहन विभागाने एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व गाड्यांना HSRP नंबरप्लेट बसवणे बंधनकारक केले आहे. यासाठी येत्या 31 मार्च 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र आजतागायत अत्यंत कमी वाहनांना या नव्या नंबरप्लेट बसविण्यात आल्याने त्यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी नविन आदेश जारी करत यासाठी आता 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. (Important information regarding HSRP number plates: Extension of deadline for installing new number plates till this date)
सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना HSRP म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बंधनकारक करत त्याकरता 31 मार्च 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र आतापर्यंत फारच कमी जुन्या वाहनांना अशा HsRP नंबरप्लेट बसवण्याचे काम झाल्याचे महाराष्ट्र परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर आधीची देण्यात आलेली 31 मार्च 2025 च्या मुदतीत वाढ करून या HSRP नंबरप्लेट बसविण्यासाठी आता 30 जून 2025 अशी नवी डेडलाईन देण्यात आली आहे. राज्याचे परिवहन आयुक्त यांनी परिपत्रक काढून यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्यामूळे जुनी नंबरप्लेट असलेल्या वाहनचालकांचे टेन्शन कमी होऊन त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.