कल्याण – डोंबिवली दि.11 मार्च :
कोवीडच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आजपासून कल्याण डोंबिवलीमध्ये कोवीड प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्यात (implementation-of-covid-preventive-decisions-begins-in-kalyan-dombivali-all-shops-were-closed-till-8-pm) आले आहेत. या निर्णयांच्या अंमलबजावणीला आज संध्याकाळपासून सुरुवात झाली. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (kalyan dombivali municipal commissioner dr. Vijay suryavanshi) यांनी दिले आहेत.
त्यानूसार कल्याण पश्चिमेतील प्रमूख बाजारपेठ असणाऱ्या परिसरात स्थानिक पोलिसांनी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुकानं बंद करण्याचे अवाहन केले. ज्याला दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत तातडीने आपापली दुकाने बंद केलेली पाहायला मिळाले. तर निर्बंध लागू झाल्याचा आज पहिलाच दिवस असल्याने 7 वाजता दुकाने बंद करण्याबाबत दुकानदार आणि व्यापारी वर्गामध्ये काहीसे संभ्रमाचे वातावरण होते. मात्र केडीएमसी प्रशासन आणि स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित परिसरात फिरून दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. कल्याणप्रमाणे डोंबिवलीमध्येही रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद झाल्याचे दिसून आले.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने लागू केलेले निर्बंध दुकानदार आणि नागरिकांनी काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन यावेळी पोलीस प्रशासनातर्फे यावेळी करण्यात आले.