Home ठळक बातम्या राजसाहेबांच्या मंत्री मंडळात काम करायला आवडेल – मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे...

राजसाहेबांच्या मंत्री मंडळात काम करायला आवडेल – मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे विधान

 

कल्याण – डोंबिवली दि.23 जुलै :
आपल्याला राज ठाकरे यांच्या मंत्री मंडळात काम करायला आवडेल असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अर्थातच मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज कल्याणात केले. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित राज ठाकरे सध्या ठाणे जिल्ह्याच्या महासंपर्क दौऱ्यावर आहेत. ठाणे जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी, मनविसे पदाधिकारी – कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी आज संवाद साधला. त्यापूर्वी कल्याणात पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. (I would like to work in Rajsaheb’s cabinet – Statement of MNS President Amit Thackeray)

बाईक रॅली काढून मनसेचे मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन

डोंबिवलीच्या पत्रीपुलावर अमित ठाकरे यांचं जल्लोषामध्ये स्वागत करण्यात आलं. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत लांबलचक अशी बाईक रॅली काढून काढण्यात आली. डोंबिवलीत येताना प्रत्येक चौकाचौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून अमित ठाकरेंचं स्वागत केलं

तब्बल 3 हजार विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि आर्थिक मदत…
डोंबिवली पूर्वेच्या सर्वेश हॉलमध्ये अमित ठाकरे यांनी महासंपर्क अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच आमदार राजू पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 3 हजार गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि फीसाठी आर्थिक मदतही अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत शालेय क्षेत्रासह इतर अनेक विषयांवर चर्चा केली. त्यानंतर अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड बोलताना सांगितले की गेल्या काही काळापासून मनसेचा डाऊनफॉल सुरू होता, जी साडेसाती सुरू होती ती आता संपली असून लवकरच मनसे मोठ्या ताकडीने उभी राहणार असल्याचे सांगत भविष्यातील राजकीय घडामोडींचे स्पष्ट संकेत दिले. यावेळी कल्याण डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा