Home ठळक बातम्या डोंबिवलीकरांच्या प्रेमामुळेच आपण आमदार,मंत्री झालो : रवींद्र चव्हाण यांची प्रांजळ कबुली

डोंबिवलीकरांच्या प्रेमामुळेच आपण आमदार,मंत्री झालो : रवींद्र चव्हाण यांची प्रांजळ कबुली

“जे देखे रवी” गौरव ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते प्रकाशन

डोंबिवली दि .31 ऑगस्ट:
डोंबिवली शहराने मला भरपूर प्रेम दिलं, या सांस्कृतिक, संस्कारमय शहरामुळे मी आमदार – मंत्री झालो असल्याची प्रांजळ कबुली सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. निमित्त होते ते मोरया प्रकाशनच्या वतीने आयोजित “जे देखे रवि” या गौरवग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे. (i-became-mla-minister-because-of-my-love-of-dombivlikar-ravindra-chavan)

डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, मोरया प्रकाशनचे अध्यक्ष दिलीप महाजन, श्रीकांत बोजेवार, श्रीराम शिधये, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ उद्योजक शंकर भोईर, मसापचे डोंबवली शाखा पदाधिकारी सुरेश देशपांडे, श्री गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.

आता यापुढे राजकारणात वैचारिक समानता आणून या देशाला परमवैभव प्राप्त होण्यासाठी भाजपचे विचार, आचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष मजबूतीसाठी अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे विचारही यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

दरम्यान या जे देखे रवि या द्वितीय आवृत्तीमध्ये सुमारे शंभरहून अधिक लेखकांनी चव्हाण यांची कार्यशैली, स्वभाव याबद्दल लिखाण केले आहे. त्याद्वारे चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करण्यात आल्याचे मान्यवरांनी सांगितले. तर कोणत्याही राजकीय पक्षाची पाळमूळ ही त्या पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यपध्दतीवर अवलंबून असतात. याठिकाणी मंत्री चव्हाण यांच्यासाठी आलेल्या जनसमुदायावरून त्यांचे येथील कार्य हे चांगले सुरू आहे हे स्पष्ट आहे. तसेच त्याआधी माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचे कार्य चांगले होते. त्यांनी कार्य केले त्यामुळे पक्षाला चव्हाण मिळाले असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी यावेळी काढले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार जोगळेकर, लीना ओक मॅथ्यू, वरिष्ठ पत्रकार अनिकेत घमंडी आदींनीही यावेळी रविंद्र चव्हाण यांच्या कार्याबाबत प्रातिनिधिक मनोगते व्यक्त केली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा