पक्षप्रवेश केलेल्यांचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून स्वागत
डोंबिवली दि.27 ऑक्टोबर :
डोंबिवलीच्या पश्चिमेतील मोठागाव आणि जैन कॉलनी विभागातील शेकडो उत्तर भारतीय बांधवांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रविवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. मंत्री चव्हाण यांच्याच हस्ते प्रवेश करण्याच्या त्यांच्या आग्रहास्तव राज्यभर प्रचारात व्यस्त असलेले मंत्री रविंद्र चव्हाण यावेळी आवर्जून उपस्थित होते. (Hundreds of North Indian brothers from Jain Colony, Dombivli West, have publicly joined the BJP)
या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजप पदाधिकारी नंदू परब, रविसिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल मंत्री चव्हाण यांनी या त्यांचे कौतुक केले. तसेच संघटना मजबुतीसाठी हे महत्वाचे पाऊल असून पक्षात आलेल्या सगळ्यांनी एकदिलाने काम करून शतप्रतिशत भाजप हे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.
डोंबिवलीच्या मराठा मंडळ संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती कल्याण ग्रामीण विधानसभा संघटक, सरचिटणीस नंदू परब यांनी दिली. यावेळी अनिल मिश्रा, अंबिका सिंग, ओम प्रकाश, विश्वकर्मा श्रीराम मिश्रा, कृष्णा मिश्रा, उमेश मिश्रा दिनेश मिश्रा, राघवेंद्र मिश्रा अजय शुक्ला, अभिषेक मिश्रा अभिषेक सोनू, अभिषेक सिंग नवीन शर्मा, विकास प्रजापती दर्शन पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला लोकसभा प्रभारी शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, दत्ता माळेकर, रवी सिंग ठाकूर, संदीप शर्मा, दिनेश दुबे ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर मीतेश पेणकर बाळा पवार उपस्थित होते.