Home कोरोना एमएमआर रिजनमधील महापालिकांमध्ये शेकडो कोटींचा कोवीड घोटाळा – मनसे आमदार राजू पाटील...

एमएमआर रिजनमधील महापालिकांमध्ये शेकडो कोटींचा कोवीड घोटाळा – मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप

महाराष्ट्राचा चेहरा म्हणून छत्रपती संभाजीराजेंना सर्व पक्षीयानी निवडून देण्याचेही केले आवाहन

कल्याण डोंबिवली दि.26 मे :
एमएमआर रिजनमधील बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, केडीएमसीसह ठाणे महापालिकांमध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. डोंबिवली एमआयडीसी भागातील विभा कंपनीच्या जागेवर केडीएमसीकडून उभारण्यात येणाऱ्या कोवीड सेंटरबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर आमदार राजू पाटील यांनी हा आरोप केला आहे.

कोवीड काळामध्ये ऑक्सिजन, इंजेक्शन असो की कंत्राटं असो. यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा कोवीड घोटाळा झालेला असून याचा आम्ही तर जाब विचारणारच. त्याचसोबत जनताही येत्या काळात त्यांना जाब विचारणार असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. तर कोवीड काळात आपण सांगत होतो की तात्पुरत्या आरोग्य सुविधांवर खर्च करण्याऐवजी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई किंवा शास्त्रीनगर रुग्णालयावर केला असता तर कायमस्वरुपी आरोग्य सुविधा मिळाल्या असत्या असे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. तर शास्त्री नगर रुग्णालयामध्ये लिफ्ट लावली त्याचे उद्घाटन केले. याचा जाब आम्ही विचारणार असून यांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा पुनरुच्चार आमदार पाटील यांनी यावेळी केला.

 

महाराष्ट्राचा चेहरा म्हणून छत्रपती संभाजीराजेंना सर्व पक्षीयानी राज्यसभेवर पाठवण्याची गरज…

छ्त्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठण्याबाबत आमदार राजू पाटील म्हणाले की छत्रपती संभाजी राजेंसंदर्भात आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी संभाजी राजे छत्रपती यांना समर्थन देण्याचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. तसेच 17 तारखेला आपण संभाजी राजेंची भेट घेतली. मात्र काही पक्षांना आमची ॲलर्जी आहे की यांनी राजेंना समर्थन दिलं मग आता जाऊ दे, अशी परिस्थिती असल्याने आम्ही त्याबाबत वाच्याता केली नसल्याचेही आमदार राजू पाटील यांनी सांगितले. तर यामध्ये आम्हाला राजकारण आणायचे नव्हते. एका चांगल्या भावनेने आम्ही छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. राज साहेबांनी तर सांगितले आहेच आणि आपलीही इच्छा होतीच त्यानुसार आमचा पाठींबा गृहीत धरा असे आम्ही त्यांना सांगितल्याचेही आमदार पाटील म्हणाले. तर या घराण्याला मतदान करण्याची संधी मिळणे ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे सांगत पक्षात या तरच तिकीट देऊ अशा अटी राजेंना द्यायला नको होत्या. सर्व पक्षीयांनी महाराष्ट्राचे नेतृत्व म्हणून त्यांना पुढे करायला सर्व पक्षियाना काही हरकत नव्हती असे सांगत छत्रपती संभाजी राजेना महाराष्ट्राचा चेहरा म्हणून तिकडे पाठवायला पाहिजे असे आवाहनही आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा