Home ठळक बातम्या केडीएमसीच्या स्वच्छता वॉकेथॉनला मोठा प्रतिसाद ; स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये करण्यात आली जागृती

केडीएमसीच्या स्वच्छता वॉकेथॉनला मोठा प्रतिसाद ; स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये करण्यात आली जागृती

कल्याण दि.29 सप्टेंबर :
सध्या सुरू असलेल्या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त केडीएमसी प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केडीएमसी विद्युत विभागातर्फे आज सकाळी स्वच्छता वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. दुर्गाडी चौक ते केडीएमसी मुख्यालयापर्यंत ही वॉकेथॉन काढण्यात आली. (Huge Response to KDMC’s Cleanliness Walkathon; Citizens were made aware about cleanliness)

गणेशोत्सवापासून केडीएमसी क्षेत्रामध्ये प्रशासनाकडून स्वच्छता पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यानिमित्त वेगवेगळे उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केडीएमसीच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या माध्यमातून आणि केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली ही स्वच्छता वॉकेथॉन राबवण्यात आली. ज्यामध्ये केडीएमसीचे स्वच्छता ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, माहिती जनसंपर्क विभाग उपआयुक्त संजय जाधव, कल्याणातील डॉन बॉस्को शाळा आणि रोटरी क्लब, हिरकणी, कल्याण डोंबिवली रनर्स अशा विविध सामाजिक संस्थांनीही मोठा सहभाग घेतल्याचे दिसून आले.

स्वच्छता हीच सेवा उपक्रमाअंतर्गत आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. याचसोबत स्वच्छता संवादाच्या माध्यमातूनही आम्ही लोकांशी संपर्क करत असून त्याद्वारे त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करत आहोत. तसेच स्वच्छतेबाबतही त्यांच्यामध्ये जागृती करत असून त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसेल असा विश्वास केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी व्यक्त केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा