डोंबिवली दि.११ फेब्रुवारी :
डोंबिवलीत आयोजित रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत असून सुमारे साडे तीनशेहून अधिक नामांकित कंपन्यांमध्ये ऑन दि स्पॉट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बेरोजगार युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ज्यामध्ये फार्मासिटीकल, केमिकल, इंजिनिअरिंग, सर्विस सेक्टर, हेल्थकेअर, बॅंक, मॅन्युफॅक्चरिंग, हाऊस किपिंग, पेट्रोकेमिकल, आयटी, कन्सल्टंट, सिक्युरिटी गार्ड अशा विविध क्षेत्रातील सुमारे तीनशेहून अधिक कंपन्यांनी वेगवेगळया प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. डोंबिवली पश्चिमेच्या कुंभार खाण पाडा येथील मॉडल इंग्लिश शाळेत हा महारोजगार मेळावा होत असून त्याला मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.