Home बातम्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर साजरा झाला ‘हाऊसकीपर्स वीक’

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर साजरा झाला ‘हाऊसकीपर्स वीक’

मुंबई दि.18 सप्टेंबर :
देशातील सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात व्यस्त विमानतळ अशी ओळख असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकताच हाऊसकिपर्स वीक साजरा करण्यात आला. (‘Housekeepers Week’ celebrated at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport)

या हाऊसकिपर्स वीक अंतर्गत विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध डान्स, खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या उल्लेखनीय सुरू असलेल्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरवही करण्यात आला. हा हाऊसकीपर्स वीक मुंबई विमानतळावर दरवर्षी साजरा केला जात असून यामध्ये प्रमुख पुढाकार अदानी समूहातील टीमकडून घेण्यात आला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा