Home ठळक बातम्या कल्याणातील भाजपच्या दोघा पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये “घरवापसी”; राकेश मुथांपाठोपाठ राजाभाऊ पाटकरही स्वगृही

कल्याणातील भाजपच्या दोघा पदाधिकाऱ्यांची काँग्रेसमध्ये “घरवापसी”; राकेश मुथांपाठोपाठ राजाभाऊ पाटकरही स्वगृही

कल्याण दि.25 ऑगस्ट :
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात प्रमूख राजकीय पक्षांमधून इनकमिंग – आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. यामध्ये आता कल्याणातील दोघा भाजप नेत्यांचीही भर पडली असून त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसचा हात आपल्या हाती धरला आहे. काही दिवसांपूर्वीच राकेश मुथा यांच्या काँग्रेस प्रवेशापाठोपाठ आता राजाभाऊ पाटकर यांनीही स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. (“Homecoming” of two office bearers of BJP in Kalyan to Congress; After Rakesh Muth, Rajabhau Patkar is also home)

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मतदारांनी महायुतीऐवजी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून दिले. मतदारांच्या या भूमिकेच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या संख्येने इनकमिंग – आऊटगोइंगला सुरुवात झाली आहे. 2014 किंवा त्यानंतरच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग झाले. मात्र नुकत्याच लागलेल्या लोकसभा निवडणुक निकालानंतर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा स्वगृही परतत आहेत.

भाजपकडून आपल्या दिखव्यासाठी कार्यकर्त्यांचा वापर…
कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेसमध्येही सध्या हेच चित्र दिसत असून अवघ्या काही दिवसांच्या फरकाने दोघा नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. ज्यामध्ये राकेश मुथा आणि आता राजाभाऊ पाटकर यांचा समावेश आहे. भाजप हा केवळ लेना बँक असून ज्यावेळी कार्यकर्त्यांना द्यायची वेळ येते तेव्हा त्यांना कोणतीही जबाबदारी द्यायची नाही. केवळ आपल्या दिखव्यासाठी वापर करायचा अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी भाजपवर टीका केली आहे. शेतकरी असो, युवक असो, बेरोजगारीचा प्रश्न असो अशा सर्वच क्षेत्रात भाजप सरकार अपयशी ठरले असून त्यांच्या या लोकशाहीविरोधी धोरणांना कंटाळून आमचे जुने सहकारी काँग्रेसमध्ये परतत असल्याची प्रतिक्रियाही पोटे यांनी यावेळी दिली.

म्हणून आपण पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला…

तर आपण एक बहुजन समाजातील कार्यकर्ता असून भाजपची सध्याची ध्येयधोरणे आपल्याला अजिबात पटत नाहीयेत. भाजपमध्ये सध्या ज्या प्रकारचे राजकरण सुरू आहे ते आपल्याला न पटणारे आणि आपल्या तत्वात न बसणारे आहे. त्यामुळे आपण पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राजाभाऊ पाटकर यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा