भाजपतर्फे डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकात दहीहंडी उत्सवाचे आयोजन
डोंबिवली दि. १९ ऑगस्ट :
हिंदुत्ववादी सण – उत्सवांची परंपरा जपणे गरजेचे असून भाजपने कोवीड काळातही त्यात खंड पडू दिला नाही असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. डोंबिवली शहर भाजपतर्फे यंदाही डोंबिवली पूर्वेतील बाजीप्रभू चौकात दहीहंडी उत्सवाचे दणक्यात आयोजन करण्यात आले आहे.
कोवीडमूळे गेली २ वर्षे सरकारी निर्बंधांमुळे सर्वच सण आणि उत्सवांवर संक्रांत आली होती. परंतू कोवीडच्या रुग्णांमध्ये झालेली लक्षणीय घट पाहता कोणत्याही निर्बंधविना यंदाची दहीहंडी साजरी होत आहे. कोरोनाचे संकट फार मोठे होते. मात्र कोवीड काळातही भाजपतर्फे सर्व निर्बंध आणि नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा केल्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. हिंदू सण आणि हिंदू संस्कृती जपण्याचे काम भाजपतर्फे केले जात असल्याचे चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान भाजपतर्फे आयोजित या दहीहंडी उत्सवाचे औचित्य साधून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत.