Home ठळक बातम्या वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे – आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनोगत

वारकरी संप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत आहे – आमदार विश्वनाथ भोईर यांचे मनोगत

कल्याण दि.9 ऑगस्ट :
हिंदू धर्मावर एकीकडे चोहोबाजूंनी आक्रमण होत असताना महाराष्ट्रातली वारकरी सांप्रदायामुळे हिंदू धर्म जिवंत असल्याची भावना आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमनाचे 375 वे वर्ष आहे. त्याचे औचित्य साधून कल्याणातील वारकरी सांप्रदाय प्रबोधन ट्रस्ट आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड हरिनाम सप्ताहाचे कल्याणात आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी ही भावना व्यक्त केली.

साधारणपणे 30 वर्षांपूर्वी आपण या वारकरी सांप्रदायाच्या संपर्कात आलो आणि आपली संपूर्ण विचारधाराच बदलून गेली. तर उंबर्डे गाव असो, सापर्डे असो की बारावे, वारकरी संप्रदायामुळे या गावांचा विकास झाला असल्याचेही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले.

तर या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन याठिकाणी होणार आहे. या दिग्गज किर्तनकारांच्या मुखातून ही संतवाणी ऐकण्याची सुवर्णसंधी कल्याणातील अध्यात्मप्रेमी नागरिकांनी गमावू नये असे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अखंड हरीनाम सप्ताहात देहू येथील गाथा मंदिराचे अध्यक्ष ह.भ. प.गुरुवर्य पांडुरंग महाराज घुले, ह.भ. प. यशोधन महाराज साखरे, ह.भ. प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे, ह.भ. प. प्रमोद महाराज जगताप यांचे कीर्तन होणार आहे.

यावेळी विधानसभा संघटक प्रभूनाथ भोईर, उपशहर प्रमुख सुनिल खारुक, माजी नगरसेवक जयवंत भोईर यांच्यासह वारकरी सांप्रदायातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा