कल्याण दि.६ नोव्हेंबर :
मुंबईमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल हलाल शो’ विरोधात हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली असून हा शो रद्द करण्याच्या मागणीसाठी कल्याणमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली.
हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादनांच्या विक्रीतून आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा होत असल्याचे समोर आल्याची माहिती यावेळी हिंदू जनजागृती समितीतर्फे देण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुंबईत येत्या शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस होणाऱ्या या हलाल शो कार्यक्रमाच्या आयोजनाला हिंदू जनजागृती समितीने विरोध दर्शवला आहे. अन्नपदार्थांचे प्रमाणीकरण करणाऱ्या एफडीए आणि एफएसएसआयसारख्या शासकीय संस्था असताना हे वेगळे हलाल प्रमाणपत्र कशाला ? यासोबतच आपल्याकडे हलाल पदार्थांची इतरांवर सक्ती करणाऱ्या खाद्यपदार्थांच्या आंतरराष्ट्रीय फूड चैनस्वर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारे फलक यावेळी आंदोलकांच्या हातात होते. तसेच देशातील बहुसंख्य समाजावर हलाल उत्पादनांची सक्ती कदापि खपवून घेतली जाणार नसल्याचेही यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिनिधींकडून स्पष्ट करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर मुंबईत होणारा हा कार्यक्रम रद्द करण्याची आग्रही मागणी हिंदू जनजागृती समितीसह इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.