
कल्याण डोंबिवली दि.25 जुलै :
कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच हवामान खात्याने उद्यासाठी वर्तवलेल्या इशाऱ्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे उद्या शुक्रवारी 26 जुलै 2024 रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. कल्याण डोंबिवलीतील 1 ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याबाबत केडीएमसी शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांनी प्रसिध्दी पत्रक काढले आहे. (Heavy rain warning: KDMC declares holiday on 26th July 2024 tomorrow)
अतिवृष्टीची शक्यता आणि हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या शक्यतेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.