Home ठळक बातम्या अतिवृष्टीचा ईशारा: केडीएमसीकडून सर्व शाळांना आज (26 सप्टेंबर 2024) सुट्टी जाहीर

अतिवृष्टीचा ईशारा: केडीएमसीकडून सर्व शाळांना आज (26 सप्टेंबर 2024) सुट्टी जाहीर

कल्याण डोंबिवली दि.26 सप्टेंबर :
काल दुपारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच हवामान खात्याने आजच्यासाठी वर्तवलेल्या इशाऱ्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे आज गुरुवारी 26 सप्टेंबर 2024 रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीतील 1 ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यम / मंडळाच्या शाळांना सुट्टी जाहीर केल्याबाबत केडीएमसी शिक्षण उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी यांनी प्रसिध्दी पत्रक काढले आहे.

अतिवृष्टीची शक्यता आणि हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या शक्यतेमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 1 ली ते 12 वी पर्यंतच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा