Home ठळक बातम्या अतिवृष्टीचा इशारा : ठाणे जिल्ह्यातील 1ली ते 12 वी पर्यंतच्या शाळांना उद्याही...

अतिवृष्टीचा इशारा : ठाणे जिल्ह्यातील 1ली ते 12 वी पर्यंतच्या शाळांना उद्याही (21जुलै 2023)सुट्टी जाहीर

ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे आदेश

ठाणे दि.20 जुलै :
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) लक्षात घेऊन आजच्या प्रमाणे उद्याही शुक्रवार 21 जुलै 2023 रोजी ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

हवामान खात्याने उद्या शुक्रवारी 21 जुलै 2023 रोजी ठाणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा ( रेड अलर्ट ) दिला आहे. त्यामुळे आजच्याप्रमाणे उद्याही ठाणे जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळांना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा