Home ठळक बातम्या हीट वेव्हचा डोक्याला ताप : कल्याण डोंबिवलीत तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस...

हीट वेव्हचा डोक्याला ताप : कल्याण डोंबिवलीत तापमानाचा पारा 42 अंश सेल्सिअस पलिकडे

सूर्यास्तानंतरही जाणवत होत्या उन्हाच्या झळा

कल्याण डोंबिवली दि.10 मार्च :
हवामान विभाग आणि हवामान अभ्यासकांनी वर्तवलेल्या हिटवेव्हच्या (Heat wave) अंदाजानुसार कल्याण डोंबिवलीसह एमएमआर रिजनमध्ये तापमानाचा पारा वाढलेला दिसून आला. कल्याण डोंबिवलीसह पलावा, उल्हासनगर, बदलापूरमध्ये तब्बल 42 अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनला दिली आहे. (Heatwave effect: Temperature in Kalyan Dombivali crosses 42 degrees Celsius)

हवामान विभागाने सोमवारपासून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यापैकी आज पहिल्याच दिवशी या हिटवेव्हमुळे (Heat wave) तापमानात मोठी वाढ दिसून आली. जे यंदाच्या उन्हाळ्याच्या हंगामातील सर्वात उच्चांकी तापमान ठरले असल्याची माहिती मोडक यांनी दिली. विशेष म्हणजे सर्व साधारण तापमानापेक्षा 42 अंश सेल्सिअस हे तब्बल 6 अंश सेल्सिअसने अधिक तापमान ठरल्याचेही त्यांनी सांगितले.

दुपारी 12 नंतर तर उन्हाच्या असह्य अशा झळा जाणवू लागल्या होत्या. तर सूर्यास्तानंतरही त्यांची धग कायम असल्याचे दिसून आले. पुढील आणखी दोन दिवस असेच वाढते तापमान राहणार असून गरज नसताना दुपारच्या वेळेमध्ये बाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आज नोंदवण्यात आलेले कमाल तापमान 🌡️

डोंबिवली ४२.३ सेल्सियस
कल्याण ४२.४ सेल्सियस
मुंबई ३७.२°
नवी मुंबई ४०
ठाणे ४०.७
विरार ४१
कर्जत ४१.४
पनवेल ४१.५
पालघर ४२
मनोर ४२
खारघर ४२
उल्हासनगर ४२
बादलपूर ४२
मुंब्रा ४२.२
पलावा ४२.८
मुरबाड ४३.२
तलासरी ४३.६

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा