Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीत सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती ; तपामान थेट ४२...

कल्याण डोंबिवलीत सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थिती ; तपामान थेट ४२ अंशापार

 

कल्याण – डोंबिवली दि. २२ एप्रिल :
कल्याण डोंबिवलतील तापमान काही केल्या कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीयेत. त्यामुळेच सलग दुसऱ्या दिवशी कल्याण डोंबिवलीतील तापमान तब्बल ४२ अंशापार नोंदविले गेल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. परिणामी निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेसदृश्य परिस्थितीने नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच कल्याण डोंबिवलीत तापमान वाढ पाहायला मिळत आहे. त्यातही गेले ३ दिवस तर तापमानात मोठी वाढ झाली आहे. कल्याण डोंबिवलीचा पारा काल ४२ अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचला होता. मात्र आज त्यामध्ये आणखी वाढ होऊन कल्याणात ४२.२ आणि डोंबिवलीत ४१.८ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सांगितले.
परिणामी नागरिकांना प्रचंड आणि असह्य अशा उकाड्याला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ४ ही वेळ म्हणजे अक्षरशः अग्नीपरिक्षा बनली आहे. पुढील २ दिवस अशीच परिस्थिती राहील असा अंदाजही मोडक यांनी व्यक्त केला आहे.

 

आज नोंदवले गेलेले तापमान

कल्याण – ४२.२

भिवंडी – ४२.२

डोंबिवली – ४१.८

उल्हानगर – ४२

ठाणे – ४१.३

पलावा – ४३

बदलापूर – ४१.६

नवी मुंबई – ४०.७

कर्जत – ४४

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा