एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद
कल्याण – डोंबिवली दि.२५ एप्रिल :
उष्णतेच्या लाटेचे परिणाम कल्याण डोंबिवलीत चांगलेच जाणवत आहेत. त्यामुळेच सलग ४ थ्या दिवशी कल्याण डोंबिवलीतील तापमानाने पुन्हा एकदा चाळीशी ओलांडत सर्वानाच घाम फोडला आहे. कल्याणात आज ४२.७ तर डोंबिवलीत ४२.३ इतक्या यंदाच्या एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
कल्याण डोंबिवलीप्रमाणे त्याच्या शेजारील शहरांमध्येही या उष्णतेच्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीसह उल्हासनगर, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई आदी शहरांमध्येही तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडल्याचे दिसून आले. तर कालचा म्हणजेच रविवार २४ एप्रिल २०२२ या दिवसाचा अपवाद वगळता या सर्व शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा अधिक नोंदवले गेले आहे. तर आज नोंदवण्यात आलेले तापमान हे यंदाच्या एप्रिल महिन्यातील उच्चांकी तापमान असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
आज नोंदवण्यात आलेले तापमान
कल्याण – ४२.७
डोंबिवली – ४२.३
उल्हासनगर – ४२.५
भिवंडी – ४२.७
बदलापूर – ४२
ठाणे – ४१.५
नवी मुंबई – ४०.५
पलावा – ४३.५
कर्जत – ४४.५