
कल्याण दि.8 डिसेंबर :
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लायन्स क्लबच्या माध्यमातून कल्याणातील भारत को ऑपरेटिव्ह बँकेत मोफत आरोग्य तपासणी शिबीर राबविण्यात आले. भारत बँकेचे ग्राहक, बँक कर्मचाऱ्यांसह इतर नागरिकांनीही या शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य शिबिरात डायबेटीस, ब्लडप्रेशर, शुगर आदींक तपासणी करण्यात आली.
भारत को ऑपरेटिव्ह बँकेतर्फे राबविण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे दीडशे नागरिकांनी लाभ घेतल्याची माहिती कल्याण ब्रँच हेड राजेश हंचन यांनी दिली. नागरिकांनी अधून मधून आरोग्य तपासणी करणे आवश्यक जेणेकरून भविष्यातील आजारांचा धोका गंभीर रूप धारण करण्यापूर्वी ओळखला जाईल असे आवाहन लायन्स क्लबच्या डॉ. अशोक जाधव यांनी सांगितले.
दैनंदिन जीवनात नागरिक बऱ्याचदा आपल्या आरोग्याबाबत पूर्व काळजी घेत नाहीत. त्यामुळे आजारी पडल्यावर त्यांना जास्त त्रास सहन करावा लागतो. याकरिता त्यांना आरोग्याबाबत सजग करण्याचे काम अशा शिबिराच्या माध्यमातून केले जात असून नागरिकांनी आरोग्य तपासणीबाबत जागृत होण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. अशोक जाधव यांनी सांगितले.