कल्याण दि.२६ डिसेंबर :
कल्याणच्या कोचिंग क्लास क्षेत्रातील सुप्रसिद्ध नाव असणाऱ्या गुरुकुल सायन्स क्लासेसचा वार्षिक सांस्कृतिक सोहळा उमंग – २०२२ आज संपन्न होत आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होणार असल्याची माहिती वैभव ठाकरे यांनी दिली.
कल्याण पश्चिमेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात आज दुपारी हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रपती पदक विजेते जलतरणपटू शुभम वनमाळी, केडीएमसीचे सचिव संजय जाधव, बँकिंग तज्ञ सागर महाजन, शिक्षण अभ्यासक योगेश गंधे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तर क्लासच्या विद्यार्थ्यांकडून विविध रंगारंग कार्यक्रमही यावेळी सादर केले जाणार असल्याचे वैभव ठाकरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला केवळ गुरुकुल क्लासच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून हा कार्यक्रम क्लासच्या यू ट्यूब चॅनेलवर लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे.