
कल्याण दि.२३जून :
‘छत्रपती शिवाजी महाराज’.महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथीनुसार ‘राज्याभिषेक दिन’. या ‘शिवराज्याभिषेक दिना’निमित्त कल्याणात शिवप्रेमींनी महाराजांना सकाळी मानवंदना दिलेली पाहायला मिळाली. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला दर रविवारी सायंकाळी शिवआरती करणाऱ्या शिवभक्तांच्या वतीने दुग्धाभिषेक करून जयघोष करण्यात आला. विशेष म्हणजे शिवप्रेमींनी कोणतीही गर्दी न करता हा उपक्रम राबविल्याचे दिसून आले.