Home ठळक बातम्या कल्याणात घराला लागलेल्या आगीत आजी आणि नात मृत्युमुखी

कल्याणात घराला लागलेल्या आगीत आजी आणि नात मृत्युमुखी

दूध नाक्याजवळील घास बाजार परिसरातील दुर्दैवी घटना

कल्याण दि. 17 जानेवारी :
कल्याण पश्चिमेच्या इमारतीतील घरामध्ये लागलेल्या आगीत आजी आणि नातीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. कल्याणच्या दुधनाक्याजवळील घासबाजार परिसरात आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. (Grandmother and granddaughter die in house fire in Kalyan)

या परिसरातील शफीक इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका घराला आज पहाटेच्या सुमारास आग लागली. ज्यामधे खातिमा माईनकर या आजी आणि इब्रा शेख या नातीचा गुदमरून मृत्यू झाला. याठिकाणी आजी आणि नात ह्या दोघीच रहात होत्या. रात्री एक वाजण्याच्या आसपास वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर दोन तासाने लाईट आल्यावर अचानक घरातील हॉलमध्ये सर्वप्रथम आग लागली असावी असा अंदाज आहे.

त्यावेळी आजी आणि नात ह्या दोघीही आत बेडरूममध्ये झोपल्या होत्या. घरामध्ये एकदम धूर झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बाहेर पडायचा प्रयत्न केला. परंतू हॉलमध्ये आग लागलेली असल्याने त्यांना घराबाहेर पडणे शक्य झाले नाही. आणि दुर्दैवाने धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्वण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा