Home ठळक बातम्या दुर्गाडीच्या जीर्णोद्धारासाठी शासनाकडून काही कमी पडू दिले जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ...

दुर्गाडीच्या जीर्णोद्धारासाठी शासनाकडून काही कमी पडू दिले जाणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दुर्गाडी किल्ल्यावर देवीचे दर्शन घेत केली आरती

कल्याण दि.23 ऑक्टोबर :
दुर्गाडी किल्ल्यावर असणारे देवीचे हे फार प्राचीन देवस्थान असून त्याच्या जिर्णोद्धारासाठी शासनाकडून काहीही कमी पडू दिले जाणार नाही अशी हमी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. काल नवरात्रौत्सवातील अष्टमीनिमित्त एकनाथ शिंदे यांनी कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर देवीचे दर्शन घेतले आणि देवीची आरतीही केली. त्यानंतर ते प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते.

दुर्गाडी किल्ल्यावर गेल्या अनेक दशकांपासून नवरात्रौत्सव सुरू असून दरवर्षी हजारो लाखो भाविक दर्शनाला येत असतात. इथल्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून साडे सात कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी अडीच कोटींचे काम सुरू आहे तर उर्वरित 5 कोटींचे काम सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

आणखी जे काही पैसे लागतील ते शासनाच्या वतीने देण्यात येतील. तसेच दुर्गाडी किल्ल्यावरील हे फार प्राचीन देवस्थान आहे. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा असून शासनाच्या माध्यमातून त्यासाठी काहीही कमी पडणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. संपूर्ण ठाणे जिल्ह्यात नवरात्रीचा उत्साह आहे. सर्व निर्बंध सरकारने गेल्यावर्षीच काढून टाकल्याने लोकं उत्साहात सर्व सण साजरे करत असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान यावेळी किल्ले दुर्गाडी नवरात्रौत्सव समितीचे अध्यक्ष, शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील आणि प्रमुख सल्लागार आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागतही करण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा