Home कोरोना गुडन्यूज : कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत 1 लाखांहून अधिक जणांची कोरोनावर मात

गुडन्यूज : कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत 1 लाखांहून अधिक जणांची कोरोनावर मात

 

कल्याण-डोंबिवली दि.27 एप्रिल :
कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला असतानाच दुसरीकडे आतापर्यंत 1 लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. (Good News: More than 1 lakh people have so far overcome corona in Kalyan Dombivali)

कल्याण डोंबिवलीमध्ये मार्च महिन्यापासून कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं. विशेष म्हणजे गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट अधिक प्रभावी असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत दोन आकडी असणाऱ्या कोरोना संख्येने मार्च संपता संपता तीन आकडी संख्या गाठली. हे ही कमी म्हणून की काय एप्रिल महिन्यात तर बहुतांश वेळा 1 हजारांहून अधिकच कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही 11 एप्रिल यादिवशी आढळलेले जवळपास अडीच हजार रुग्ण ही कल्याण डोंबिवलीतील आजवरची सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे.

दररोज येणाऱ्या कोरोनाच्या वाढीव आकड्यांमूळे काहीसे चिंतेचे वातावरण असतानाच कोवीडवर मात केलेल्या रुग्णांची संख्याही तितकीच मोठी असल्याचे एकंदर आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या वर्षीपासून आतापर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये 1 लाख 2 हजार  734 जणांनी कोरोनाला हरवलं आहे. ही आपल्या सर्वांच्याच दृष्टीने निश्चितच सकारात्मक आणि दिलासादायक बाब आहे. कल्याण डोंबिवलीत दररोज मोठ्या संख्येने कोवीड रुग्ण सापडत असले तरी त्यातून बरे होणाऱ्या रुग्णांची रोजची संख्याही मोठी आहे.

त्यामूळे सध्याच्या परिस्थितीत कोवीडवर मात केलेल्या या 1 लाखांहून अधिक व्यक्ती इतरांमध्येही कोरोनाला हरवण्याचा आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण करतील यात कोणतेही दुमत नाही. आणि हाच गेल्या वर्षभरापासून अविरतपणे कोवीडशी थेट दोन हात करणाऱ्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, शासकीय अधिकारी आणि इतर सर्व संबंधित व्यक्तींचा खरा सन्मान ठरेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा