सर्व प्रमूख रस्त्यांचे लवकरच क्रॉंक्रीटीकरण करण्याचा मार्गही मोकळा
डोंबिवली दि. 21 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ३६ महत्त्वाच्या रस्त्यांच्या बांधणीसाठी सुमारे ४५५ कोटी रुपयांचा निधी एमएमआरडीएने मंजूर केला आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये आपल्याला ख-या अर्थाने आनंदाची आणि गोड बातमी मिळाल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली आहे. तसेच या महत्वाच्या निर्णयामूळे कल्याण डोंबिवलीतील सर्व प्रमूख रस्त्यांचे लवकरच क्रॉंक्रीटीकरण करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकासासाठी रु. ४७२ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. परंतू महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हा रस्ते कामांचा निधी रद्द करण्यात आला होता. परिणामी चांगल्या रस्त्यांअभावी नागरिकांचीही अतिशय अडचण होत होती. त्यामुळे रस्त्यांच्या या विकासनिधीसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये हा निर्णय झाला. याचे सर्व श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असल्याचेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
तसेच तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे रस्त्यांच्या विकासासाठी प्राधान्याने लक्ष देण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. परंतू आज शिंदे – फडणवीस सरकारमुळे ख-या अर्थाने कल्याण-डोबिंवलीकरांना न्याय मिळाला असल्याची भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली.
त्या ३६ रस्त्यांची नावं जनतेसमोर सादर करा. पैकी प्रत्येक रस्त्याचा अंदाजे खर्च सादर करा.