Home ठळक बातम्या गुड न्यूज; कल्याण डोंबिवलीकरांनो आता घरच्या घरी मिळवा नर्सिंग केअर सुविधा

गुड न्यूज; कल्याण डोंबिवलीकरांनो आता घरच्या घरी मिळवा नर्सिंग केअर सुविधा

हेल्पिंग हॅण्ड केअर सर्व्हिसेस संस्थेचा पुढाकार

कल्याण डोंबिवली दि.31 मार्च :
हेल्पिंग हँड केअर सर्व्हिसेस या संस्थेने कल्याण डोंबिवलीमध्ये घरगुती नर्सिंग देखभाल सेवा (Nursing Care Services) देण्याची सुरुवात केली आहे. याद्वारे संबंधित व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबियांना अतिशय माफक दरांमध्ये थेट घरच्या घरीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती हेल्पिंग हँड संस्थेचे प्रमूख धीरज बावस्कर यांनी दिली आहे. (Good news; Kalyan Dombivali residents can now get nursing care facilities at home)

सध्याच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा- सुविधा मिळवण्यात येणाऱ्या विविध अडचणीचा विचार करता आता या सर्व सेवा – सुविधा घरापर्यंत देण्यात येत आहेत. ज्यासाठी कौशल्यपूर्ण आरोग्य सेवकांची टीम 24×7 तैनात असणार असून घरबसल्या सुरक्षित वातावरणात उत्तम वैद्यकीय सेवा मिळू शकणार असल्याचेही बावस्कर यांनी सांगितले. तसेच या सर्व सेवा मिळवण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिपशन आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

या संस्थेकडून देण्यात येणाऱ्या सेवा:

नर्सिंग केअर:
– शस्त्रक्रियेनंतरची काळजी
– जखमेची देखभाल
– औषधांचे व्यवस्थापन
– IV थेरपी
– वेदना नियंत्रण (PAIN RELIEF)
– दैनंदिन कामांमध्ये मदत

पॅलियेटिव्ह आणि शेवटच्या टप्प्यातील काळजी:
– जीवन मर्यादित आजारांसाठी सेवा
– वेदना आणि लक्षणांचे व्यवस्थापन
– रुग्ण आणि कुटुंबासाठी भावनिक आणि मानसिक आधार

लॅबोरेटरी टेस्टिंग:
– घरीच रक्त, लघवी किंवा इतर नमुन्यांचे संकलन
– सोयीसाठी त्वरित रिपोर्ट्स उपलब्ध

ज्येष्ठांची देखभाल:
– दैनंदिन जीवनातील कामांमध्ये मदत
– सोबत आणि देखरेख
– अल्झायमर आणि डिमेन्शियाग्रस्त रुग्णांची काळजी

घरबसल्या एक्स रे आणि ईसीजी
या सुविधेच्या माध्यमातून घरबसल्या एक्स रे आणि ईसीजी सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ही वैद्यकीय सेवा का निवडावी?

सुविधा आणि आराम: आवश्यक ती वैद्यकीय सेवा घरीच मिळत असल्याने हॉस्पिटलला वारंवार जाण्याची आवश्यकता नाही. आणि रुग्ण तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा त्रासही कमी होतो.

वैयक्तिक सेवा: तुमच्या गरजेनुसार खास देखभाल योजना तयार केल्या जातात. जेणेकरून तुम्हाला योग्य आणि आवश्यक ती सेवा मिळू शकेल.

प्रशिक्षित आणि अनुभवी कर्मचारी: आमचे सर्व आरोग्यसेवा कर्मचारी अनुभवी, प्रमाणित आणि उच्च दर्जाच्या सेवा देण्यास कटिबद्ध आहेत.

– २४/७ सेवा: तुमच्या गरजेनुसार आम्ही लवचिक वेळापत्रक आणि तातडीची सेवा उपलब्ध करून देतो.

अपॉइंटमेटसाठी संपर्क:
अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी किंवा आमच्या घरगुती वैद्यकीय सेवांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 9850569796 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा