
कल्याण – डोंबिवली दि.21 जून :
कल्याण डोंबिवली महापालिका कार्यक्षेत्रात उद्या 22 जून रोजी 18 वर्षे आणि त्यावरील वयोगटाच्या नागरिकांसाठी एकूण 22 ठिकाणी लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याठिकाणी कोविशील्ड लस देण्यात येणार असून 50 टक्के ऑनलाईन स्लॉट बुक करून आणि 50 टक्के ऑफलाइन पध्दतीने हे लसीकरण होणार असल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.
ऑनलाइन बुकिंसाठी आज रात्री 10 वाजता स्लॉट खुले होणार असल्याचेही केडीएमसीतर्फे सांगण्यात आले आहे.