Home ठळक बातम्या केडीएमसी महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस द्या – कामगार सेनेची मागणी

केडीएमसी महापालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस द्या – कामगार सेनेची मागणी

 

कल्याण डोंबिवली दि.३ ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांना यंदा २५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात केडीएमसी प्रशासनाला एक पत्र देण्यात आले असून त्याद्वारे ही मागणी केल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस रवी पाटील यांनी दिली. (Give bonus of Rs 25 thousand to KDMC municipal employees – demand of labor organisation)

यंदा ऑक्टोबर म्हणजेच सुरू असणाऱ्या महिन्यातच दिवाळी सण येत आहे. त्या पार्श्वभमीवर महापालिकेच्या सर्व कामगार – कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना तसेच रोजंदारी ठोक पगारी, परिवहन कर्मचारी तसेच बालवाडी शिक्षिका या सर्वांना २०२१-२२ या वर्षासाठी २५ हजार रुपये बोनस देण्याची मागणी करण्यात आली आहे.
तर दिवाळीची खरेदी करण्यासाठी दिवाळी सुरू व्हायच्या किकणा १० ते १५ दिवस आधी ही रक्कम देण्याची विनंतीही कामगार सेनेतर्फे करण्यात आल्याचे सरचिटणीस रवी पाटील यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा