Home ठळक बातम्या दातदुखीची आता चिंता नको : कल्याणात सुरू झालेय जी मॅक्स ॲडव्हान्स मल्टीस्पेशालिटी...

दातदुखीची आता चिंता नको : कल्याणात सुरू झालेय जी मॅक्स ॲडव्हान्स मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक

आता एकाच छताखाली मिळणार अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे उपचार

कल्याण दि.8 एप्रिल :
दाताच्या कोणत्याही दुखण्याने त्रस्त असाल तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आहे. कल्याणात आता एक अत्याधुनिक आणि सुसज्ज असे “जी मॅक्स ॲडव्हान्स मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक ” सुरू झाले आहे. ज्याठिकाणी तुम्हाला एकाच छताखाली दातांशी संबंधित सर्व प्रकारचे अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत.

डॉ. स्नेहा अमोल चव्हाण यांच्या पुढाकाराने हे ॲडव्हान्स मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक ” सुरू झाले आहे. डॉ. स्नेहा यांनी दंत चिकित्सेसाठी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध असलेल्या नायर डेंटल कॉलेजमधून आपले पोस्ट ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी गव्हर्मेंट डेंटल कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणूनही काम केले आहे.

आता या उपचारांसाठी ठाणे – मुंबईला जायची आवश्यकता नाही…
कल्याणातील एक प्राईम लोकेशन असलेल्या खडकपाडा परिसरात हे जी मॅक्स ॲडव्हान्स मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक सुरू झाले आहे. याठिकाणी रुग्णांना सर्व ट्रीटमेंटसाठी अनुभवी स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध असणार आहेत. रूग्णांना वारंवार यायला लागू नये म्हणून सिंगल सिटिंग रूट कॅनल उपचार पद्धती, दाताच्या उपचारानंतर कमीत कमी दुखण्यासाठी विशेष काळजी, स्माईल डिझायनिंग, डेंटल इम्प्लांट, अस्थेस्टिक डेंटिस्ट्री, ऑर्थोडेंटिक डेंटिस्ट्री, लहान मुलांसाठी वेगवेगळ्या उपचार पध्दती, हृदयविकार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी याठिकाणी विशेष कार्डिओलॉजीस्ट तसेच दिव्यांग मुलांवरही याठिकाणी दंत उपचार करण्यासाठी विशेष सुविधा आणि रुग्णांच्या फॉलो अपसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.

त्यासोबतच याठिकाणी अँडव्हान्स इंस्ट्रूमेंटस्, हायक्लास प्रोस्थेसिस, डेंटल इम्प्लांटसाठी स्पेशल एक्स्पर्ट, डेंटल प्रोस्थेसिससाठी स्पेशल एक्स्पर्ट असतील अशी माहिती या क्लिनिकच्या प्रमुख डॉ. स्नेहा अमोल चव्हाण यांनी दिली. तसेच या सर्व अत्याधुनिक उपचार पद्धतींसाठी रूग्णांना आता ठाणे किंवा मुंबईला जाण्याची आवश्यकता नाही. कल्याणात” जी मॅक्स ॲडव्हान्स मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक”मध्ये एकाच छताखाली हे सर्व अत्याधुनिक उपचार आता उपलब्ध झाले आहेत.

जी मॅक्स ॲडव्हान्स मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक,
221, 2 रा मजला, रॉकमाऊंट बिल्डिंग,
खडकपाडा सर्कल, कल्याण- पश्चिम
वेबसाईट : www.gmaxdentalclinic.com
ई मेल : gmaxdentalclinic@gmail.com

अपॉइंटमेंटसाठी संपर्क : 95948 31000

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा