कल्याणपाठोपाठ डोंबिवलीतही काँक्रिट रस्त्यांच्या कामांचा धडाका
डोंबिवली दि. 25 डिसेंबर :
वेगवेगळे रस्ते असो की उड्डाणपूल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीच्या उत्तम कनेक्टीव्हीटीसाठी हजारो कोटींचा निधी उपलब्ध होत असल्याची माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. कल्याण पूर्वेपाठोपाठ डोंबिवलीच्या विविध भागांतील काँक्रिटच्या रस्त्यांचे राज्याचे पीडब्ल्युडी मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या प्रभागात झालेल्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
नागपूरप्रमाणे कल्याण शीळ मार्गावर डबल डेकर उड्डाणपूल…
कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरू आहेत. ज्याठिकाणी रस्ते नव्हते ते रस्ते बनवण्याचे काम सुरू आहे. या कामांची सुरुवात कल्याण शीळ रोडपासून झाली. आधी याठिकाणी खड्डे होते आणि आता हा रस्ता एकदम सुयोग्य स्थितीत आला आहे. तर नागपूरमध्ये ज्याप्रमाणे डबलडेकर फ्लाय ओव्हर उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रोची निर्मिती करण्यात आली आहे. अगदी त्याचप्रमाणे कल्याण शीळ मार्गावरही आणखी एक उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. या डबलडेकर उड्डाण पुलावर मेट्रो त्याखाली रस्ता बांधण्याचा प्रस्ताव आपण एम एम आर डी ए ला पाठवला असून त्यासोबतच शिळफाटा ते रांजणोली असा थेट उड्डाणपूलही बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गेल्या पाच सहा महिन्यात अत्यंत गतिमानतेने विकासकामे…
राज्यामध्ये शिवसेना आणि भाजपचे सरकार आल्यानंतर गेल्या पाच सहा महिन्यात अत्यंत गतिमानतेने विकासकामे सुरू झाली आहेत. शिंदे आणि फडणवीस खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करत आहेत. या पाच सहा महिन्यात अनेक प्रलंबित असणारे लोकहिताचे निर्णय अंमलबजाणी केली जात आहे. शेतकरी,दिलासा देण्याचे कामे. याआधीच्या सरकारने केवळ निकष नियमांवर बोट ठेवून कामे प्रलंबित ठेवली. मात्र हे सरकार सर्वसामान्यांसाठी आवश्यक निर्णय घेण्याचे करत आहे. गेल्या अडीच वर्षांत ठप्प झालेला विकास पुन्हा वेगाने करण्याचे काम सरकार करत असल्याचे सांगत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडले.
कल्याण डोंबिवलीमध्ये अत्यंत गतिमानतेने विकासकामे सुरू…
कल्याण डोंबिवलीमध्ये अत्यंत गतिमानतेने विकासकामे सुरू झालेली पाहायला मिळत आहेत. नागरिकांना पावसामध्ये जाणवणारा खड्ड्यांचा त्रास यंदा मात्र जाणवणार नाही. तसेच माणकोली पुल पूर्णत्वास येत असून त्यासोबत कल्याण शीळ रोडचेही काम पूर्ण झाले आहे. तसेच काटई ते ऐरोली फ्री वेचा पहिला टप्पा नव्या वर्षांत पूर्ण होईल. पायाभूत सुविधांच्या माध्यामातून हे सरकार आपल्या परिसरात अत्यंत चांगली कनेक्टीव्हीटी निर्माण करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हजारो कोटींचा निधी कल्याण डोंबिवलीला मिळत असून राजेश मोरे यांच्याप्रमाणे इतर नगरसेवकांच्या प्रभागातही मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जातील असा विश्वासही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी वर्तवला.
घरांचा प्रश्न सुटत नव्हता ते निकष बदलून त्यानं हक्काचे घर देण्याचे काम या सरकारने केले. तर यंदाच्या दिवाळीत गरिबांची दिवाळी गोड करण्याचे काम नागरी अन्न पुरवठा मंत्री रविद्र चव्हाण यांच्या विभागामार्फत झाले. तसेच पीडब्ल्यूडी खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे केली जात असून येत्या काळात वाहतूक कोंडीतून नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी डोंबिवली एमआयडीसीतील योगेश म्हात्रे आणि पूजा म्हात्रे या नगरसेवक दाम्पत्याच्या प्रभागात सुरू असणाऱ्या काँक्रिट रस्त्यांच्या कामाची पाहणी केली. तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली.
यावेळी झालेल्या भूमिपूजन सोहळ्याला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहर प्रमुख राजेश मोरे, सचिव भाऊसाहेब चौधरी, युवासेनेचे दिपेश म्हात्रे यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.