डोंबिवली दि.२६ जानेवारी :
प्रजासत्ताक दिनानिमित,भारतीय सैनिकांना मानवंदना देण्यासाठी रनर्स क्लन फाऊंडेशन, डोंबिवलीतर्फे एक दौड वीर जवानोंके लिये” या संकल्पनेनुसार गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली अशी ६५ कि. मी अंतराची दौड करण्यात आली. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या विविध शहरांतून दीडशे धावपटू सहभागी झाले होते. (From Gateway of India to Dombivli ‘Ek Daud Veer Jawano Ke Liye’)
गेटवे ऑफ इंडिया येथून २६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता सुरू झालेली ही दौड मंत्रालय, एनसीपीए हुतात्मा चौक, पी डिमेलो रोड, शिवडी, वडाळा, सायन सर्कल, वाशी बस डेपो, कोपर खैरणे, महापे, शिळफाटा मार्गे डोंबिवली पूर्व आणि पश्चिम करत गणपती मंदिरहून कॅ. विजयकुमार सच्चान स्मारक येथे सलामी देवून ग्लोब यूनायटेड, उस्मा पेट्रोल पंपच्या पुढे डोंबिवली येथे सकाळी ९.३० वाजता समाप्त झाली. या दौडमध्ये डोंबिवली, कल्याण, ठाणे, पुणे, नवी मुंबई, मुंबई, पालघर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, बडोदा आदी ठिकानाहून जवळपास १०० पेक्षा जास्त धावपटू सहभागी झाले होते ..